Category Archives: शब्द एका स्वप्नाळूचे

चिमुकलं कोणी येणार येणार ग…

inshot_20170111_142611

  • Pic credit: Google pictures 
Advertisements

माझ्या गोब्ल्या गुब्बुटल्या…..

इवल्या इवल्या नाकावरती,
‘लागोबाचा’ शेंडा..अन,
‘गोब्ल्या गोब्ल्या’ गालामध्ये,
रुस्व्याचा फुग्गा..

ए, रागावलेल्या गोबऱ्या गुब्बुटल्या,
माझ्यावरचा राग जरा सोडशील का?
तुझी ‘श्वल्ग-नगली’ सोडून कधी,
मला ही मिठी तू मारशील का?

परी-ताईशी तू रोजच खेळतोस,
कधीतरी आईशीही खेळशील का?
लुटू लुटू पळून, खळ खळ खिद्ळून,
हळूच येउन घट्ट बिलगशील का?

खूप खूप खेळू, मज्जा मज्जा करू,
आईच्या हाताने पोटभर खाऊ,
चिऊताईचा घास भरवताना,
आईकडे गोड हसून बघशील का?

तुझी नी माझी जोडी घट्ट घट्ट करू,
बागेमध्ये जाऊ अन हत्तीवरती फिरू,
बाबाला घोडा करून टिकटाक टिकटाक करू,
गोल चक्कर झाली कि गोड पापा देऊ..

बाबाला रोज स्वप्नात भेटतोस बरा,
माझ्याशीच बरा तुझा अबोला का?
बाबाच दर्पण आहेस कि माझी तू छबी,
हे तरी मला कधी कळू देशील का?

झोपेची परी जेव्हा पापणीवर निजेल,
झोपायला मग मऊ कुशी लागेल,
तेव्हा तरी तुला आईची आठवण येईल का?
तेव्हा तरी, सांग ना, साद घालशील का?

                         ~शीतल @ dreamingwordz.wordpress.com

दगड विश्रामाच्या मैलाचा!! ( Retirement poems Cntd.)

हजार वळणांच्या वाटेवरती,
एक वळण येते विश्रामाचे,
थांबून थोडे घाम टिपायचे,
मागल्या श्रमांचे मोल वेचायचे….

दूर लोटल्या त्या कामाच्या ‘फायली’,
अन तो रह्दारीतला प्रवास,
‘१० च ऑफिस’, ‘१० च ऑफिस’ —
कुठल्या कुठे गेला तोही ध्यास….

आता फक्त उरले ते–
गोड-कटू आठवणींचे सोनेरी क्षण,
प्रत्येक आठवणीत लपली आहे,
आयुष्यातील अनमोल शिकवण.

काकांची साथ, मुला-सुनांचा हात,
अन ओसंडणारे प्रेम नातीच्या खळीतले,
ह्यातच तर झाले खरे,
चीज तुमच्या साऱ्या कष्टांचे.

पुढचा मार्ग हि सोपा-सुलभ,
नवीन आकाश गाठायचा,
नवे छंद जोपासायचा,
अन नव्या आठवणी बनवायचा….

तर, आणखी हझार वळणे आहेत,
पुढे पार करायची,
समाधानाने, आनंदाने घ्यायची आहे,
भरारी फिनिक्स पक्षाची!!

 

~शीतल @ dreamingwordz.wordpress.com

कार्यरत राहा! #Retirement Poem for Father-in-law

पप्पा सांगा कुणाचे?
पप्पा माझ्या मम्मिञ्चे…
लग्नाच्या गाडीचे दोन चाक जसे,
आयुष्यभर एकमेकांना सांभाळले तसे..
पप्पा, ह्या लग्नाच्या ऑफिस-आतून तुम्हाला सुटका नाही..! 🙂

पप्पा सांगा कुणाचे?
पप्पा माझ्या अनुचे…
चुकांवर्ती पडतात फटके जसे,
त्याहून अधिक लेकीवरचे प्रेम ओसंडे..
लाडक्या मुलीच्या प्रेमासाठी,
पितृत्वाच्या ऑफिस-आतून पप्पा तुम्हाला सुटका नाही..

पप्पा सांगा कुणाचे?
पप्पा माझ्या ‘अहोन’चे ..
कुंभार देतो मातीच्या गोळ्याला आकार जसा,
आयुष्याला ह्यांच्या वळण सुंदर दिला तसा..
अजूनही काही वळणे आहेत राहिलेली..
तर ह्या कुम्भारकामातून पप्पा तुम्हाला सुटका नाही…

पप्पा सांगा कुणाचे?
आता पप्पा फक्त माझे..
विना शंका स्वीकारले मला,
अन हरवलेली पित्र-छाया हि दिली मला..
पप्पा तुमच्या ह्या ऋणातून मला सुटका नाही,
अन आमच्या प्रेमाच्या ऑफिस-आतून तुम्हाला सुटका नाही…

तर, कार्यरत राहा! 🙂

 ~शीतल @ dreamingwordz.wordpress.com

Lihita lihita kalam thabakte…

To all those who understand my native language, Marathi – Ram ram pavhna! 🙂 Posting one of my marathi creations for the first time. I apologize to my friends who do not understand the language, but I couldn’t resist posting it 🙂

|| Shree ||

amubdaypoem_1 amubdaypoem_2 amubdaypoem_3

 

~शीतल @ dreamingwordz.wordpress.com