दगड विश्रामाच्या मैलाचा!! ( Retirement poems Cntd.)

हजार वळणांच्या वाटेवरती,
एक वळण येते विश्रामाचे,
थांबून थोडे घाम टिपायचे,
मागल्या श्रमांचे मोल वेचायचे….

दूर लोटल्या त्या कामाच्या ‘फायली’,
अन तो रह्दारीतला प्रवास,
‘१० च ऑफिस’, ‘१० च ऑफिस’ —
कुठल्या कुठे गेला तोही ध्यास….

आता फक्त उरले ते–
गोड-कटू आठवणींचे सोनेरी क्षण,
प्रत्येक आठवणीत लपली आहे,
आयुष्यातील अनमोल शिकवण.

काकांची साथ, मुला-सुनांचा हात,
अन ओसंडणारे प्रेम नातीच्या खळीतले,
ह्यातच तर झाले खरे,
चीज तुमच्या साऱ्या कष्टांचे.

पुढचा मार्ग हि सोपा-सुलभ,
नवीन आकाश गाठायचा,
नवे छंद जोपासायचा,
अन नव्या आठवणी बनवायचा….

तर, आणखी हझार वळणे आहेत,
पुढे पार करायची,
समाधानाने, आनंदाने घ्यायची आहे,
भरारी फिनिक्स पक्षाची!!

 

~शीतल @ dreamingwordz.wordpress.com

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s